आॅनलाइन लोकमतधुळे : महापालिका निवडणुकीच्या निकालात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झालेली आहे. त्यामुळे हा आपला पराभव नाही तर ईव्हीएम मशीनचा विजय आहे. महापालिकेच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार असून, वर्षभरातच पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवायची असल्याने, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असा सल्ला आमदार अनिल गोटे यांनी दिला. महापालिका निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमिवर लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन व आगामी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनी आज पक्षाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. कामगार कल्याण भवन येथे हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर तेजस गोटे, देवराम पाटील, संजय बगदे, आदी उपस्थित होते. आमदार गोटे यांनी भाजपाचे नाव न घेता पक्षावर टीका केली. ते म्हणाले त्यांना मिळालेले यश हे कलंकीत आहे. आपला विजय झालाच कसा असे त्यांच्याच उमेदवारांनाही प्रश्न पडला आहे. त्यांना मते मिळाली नसून मते मिळवून घेतली आहे. मतदानाच्या शेवटच्या क्षणात केवळ पैसे दिले गेले नाहीत तर पैसे फेकण्यात आले असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान निवडणुकीसंदर्भात काही प्रख्यात वकीलांशी बोलणी झालेली आहे. निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार असून, वर्षभरातच पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवायची आहे. यावेळी ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान एक रूपयाही खर्च न करता, मतदारांनी लोकसंग्रामला दुसºया क्रमांकाची मते दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचेही आभार मानले.
धुळे महापालिकेच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 3:18 PM
आमदार अनिल गोटे यांचा इशारा
ठळक मुद्देआमदार गोटे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवादमतदानात हेराफेरी झाल्याचा आरोपकार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना