धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटून आलेला भारतीय सैन्यदलातील जवान चंदू चव्हाण याने तेथील त्रासाला कंटाळून सैन्य दलाचा राजीनामा डी.एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सोपविला आहे.पाकिस्तानातून सुटका झाल्यानंतर निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने चंदू चव्हाण यांना ८९ दिवसांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची अहमदनगर येथील लष्करी आस्थापनेत बदली केली होती. मात्र त्याठिकाणी सैन्य दलात मला वाईट वागणूक मिळत असून माझ्याकडे वाईट नजरेने बघितले जात असल्याने त्यास कंटाळून राजीनामा दिल्याचे चंदू चव्हाण यांनी कळविले. चव्हाणच्या राजीनाम्यामुळे भारतीय सैन्य दलात खळबळ उडाली आहे. राजीनाम्यावर अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे़
चंदू चव्हाणचा सैन्य दलाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:19 PM