लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भिमा-कोरेगाव येथे गेल्यावर्षी घडलेल्या प्रकाराला येत्या १ जानेवारीला १ वर्ष पूर्ण होणार आहे़ त्यामुळे यंदा भिमा-कोरेगाव येथे जाहीर सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे़ पण सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी धुळयात पत्रकार परिषदेत केली़ २०१९ मध्ये परिवर्तन घडेल असेही ते म्हणाले़भिमा-कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर गेल्यावर्षी हल्ला करण्यात आला होता़ याप्रकरणी दोषी असलेल्या मिलिंद एकबोटेंना अटक झाली पण संभाजी भिडे यांना अटकही न करता मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिट दिली़ त्यामुळे भिमा-कोरेगाव येथे असे दहशत माजविण्याचे प्रकार होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, भिमसैनिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली़ तसेच संघप्रणित सरकार आल्यापासून जातीय व धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे़ संविधान समीक्षा आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेश्वचलैय्या यांनी संविधानात काहीच दोष नसून अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाली नाही, म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात प्रश्न निर्माण झाल्याचे कवाडे यांनी स्पष्ट केले़
२०१९ मध्ये देशात परिवर्तन घडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:37 AM