आॅनलाइन लोकमतसोनगीर (जि.धुळे) :मुंबई आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण झाले त्यावेळी नागरिकांना रस्ता ओलांडू नये म्हणून शिरपूर व धुळे कडे जाणाºया बस थांबाच्या परिसरात व बालाजी नगरच्या जवळ भुयारी मार्ग ( बोगदा ) तयार करण्यात आला. मात्र या बोगद्या मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यात बस थांबा जवळी भुयारी मागार्तून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्नात सर्व्हिस रस्ता खोदून त्यातून पाणी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चारीचा वाहन चालकांना वाहनांच्या नुकसानी सोबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील महामार्गाचे चौपदरीकरण करून विस्तार करण्यात आला त्यावेळी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व गावाच्या पूर्व भागात असलेल्या वस्त्या मधील नागरिकांच्या सुविधेसाठी बालाजी नगर व शिरपूर - धुळे बस थांबा जवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आले होते. मात्र महामार्ग निर्माण झाल्यापासूनच पावसाळ्यात या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते महिन्यापूर्वी नागरिकांच्या मागणी नंतर बस थांबा जवळ असलेल्या भुयारी मागार्तील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून शिरपूर बस थांबा वरील सर्व्हिस रस्त्यावर साधारण एक फुटा पर्यंत खोल व बारा फूट रूंद अशी चारी खोदून पावसाळी पाणी पुढे नाल्याद्वारे बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न येथील टोलप्लाझावरील प्रशासनाने केला. मात्र यावेळी सर्व्हिस रस्त्याची वाट तर लागली व शिरपूरकडून येत असलेल्या बस अथवा इतर वाहनांना या चारीतुन आपले वाहन काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या मोठ्या अवधी नंतर बस सुरू झाल्या आहेत. धुळ्याकडे जाणाºया बस अथवा इतर खाजगी वाहने याच सर्व्हिस रस्त्यावरून जात असतात. मात्र पाण्याच्या निचºयासाठी केलेल्या या चारी मधून मार्ग काढतांना वाहनचालकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. बस अथवा इतर अवजड वाहन , दुचाकीचा खालील भाग हा चारीत रस्त्याला टेकत असल्याने वाहनाचे व टायरचे नुकसान होत असल्याचे चालक सांगतात. परिणामी यावेळी काही वेळा बस अथवा इतर वाहनचालक थेट उड्डाणपुलावरून वाहन घेऊन जातात. त्यामुळे बस अथवा इतर वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर बालाजी नगर जवळील भुयारी मार्गत पाणी साचत असल्याने व ते पाणी कुजून त्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने काही नागरिक थेट महामार्ग ओलांडण्याचा धोकेदायक प्रयत्न करतात. दरम्यान संबंधित प्रशासनाने या भुयारी मागार्मुळे नागरिकांना होणाºया असुविधेची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.
सोनगीर येथे पाणी निचऱ्यासाठी सर्विस रस्त्यावर खोदली चारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:28 PM