लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराची हद्दवाढ ५ जानेवारी २०१८ ला झाली होती़ त्याबाबतची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने लागलीच समाविष्ट झालेल्या गावांमधील ग्रामपंचायतींचे संपूर्ण रेकॉर्ड ताब्यात घेतले होते़ या ‘रेकॉर्ड’ची संयुक्त तपासणी आता महापालिका व जिल्हा परिषद करणार आहे़‘रेकॉर्ड’ केले होते ‘सील’शासनाच्या नगरविकास विभागाने ५ जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेनुसार वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, नगाव, वरखेडी, बाळापूर, मोराणे, पिंपरी ही गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाली़ आधी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौकिमी इतके होते पण हद्दवाढीमुळे त्यात ५४़६२ चौकिमी इतकी भर पडल्याने शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौकिमी इतके झाले आहे़ हद्दवाढीची अधिसूचना महापालिकेला प्राप्त होताच दुसºया दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ महापालिकेने ताब्यात घेऊन ‘सील’ केले होते़ मनपा-जि़प़ संयुक्त बैठक७ फेब्रुवारी २०१८ ला महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने पुढील कार्यवाहीसंदर्भात संयुक्त बैठक घेतली होती़ या बैठकीत, ग्रामपंचायत क्षेत्रात चौदावा वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, दलित वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा, रस्ते दिवाबत्ती देयके यांसह जलयुक्त शिवार योजना, आवास योजना या योजनांमधून सुरू असलेली कामे पूर्ण करावीत व त्याची माहिती मनपाला सादर करावी, मनपाकडून संबंधित कामांची तपासणी करून देयके करणे, नरेगांतर्गच्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन मागवून पुढील कार्यवाही करणे, ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे सुरू किंवा प्रस्तावित असतील ती कामे कोणत्या गट क्रमांकात आहे, तो गट क्रमांक हद्दवाढीत समाविष्ट आहे का? हे तपासणे यांसह विविध सूचना देण्यात आल्या होत्या़ तरीही अभिलेख अपूर्णचत्यानंतरही काही ग्रामपंचायतींचे अभिलेख महापालिकेला प्राप्त झाले नसून काही अभिलेख अपूर्ण आहेत़ त्यामुळे तपासणी कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे़ मनपाला काही ग्रामपंचायतींच्या ‘रेकॉर्ड’मध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने चौकशी सुरू करण्यात आली होती़ त्याबाबतचा अहवालही प्राप्त होण्याची शक्यता आहे़
ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 4:55 PM