धुळे : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे बारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत दररोज फक्त एकच उत्तरपत्रिका तपासण्यात येईल, अशी माहिती धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आली.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची २८ फेब्रुवारी रोजी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. २ मेनंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता देणे, कायम शब्द काढून मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे, पायाभूत पदे मंजूर करणे आदी विषयांसह शिक्षणाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा झाली. या वेळी शिक्षणमंत्र्यांनी अर्थखात्याशी संबंधित मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांबरोबर येत्या ३-४ दिवसात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.ए. पाटील, सचिव प्रा.डी.पी. पाटील, प्रा.एन.टी. ठाकरे, प्रा.एस.एन. पाटील, प्रा.जी.पी. शास्त्री, प्रा.एस.डी. पाटील, प्रा.बी.एन. अहिरे, प्रा.एस.जी. शिरसाठ, प्रा.बी.बी. पाटकर, प्रा.आर.जे. पवार यांनी केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलऩ़जोपर्यंत मागण्यांच्या तातडीने अंमलबजावणीबाबत लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत असहकार आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. रोज फक्त एकच उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णयही त्यांनी शिक्षणमंत्र्यांना कळविला आहे. लवकरच अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन लिखित आदेश न काढल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. होणाºया परिणामाची जबाबदारी शासनाची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
रोज एकच उत्तरपत्रिका तपासणार
By admin | Published: March 02, 2017 12:51 AM