आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी अभियानास १ एप्रिलपासून सुरूवात झालेली आहे. ही तपासणी ३१ मे पर्यंत करण्यात येईल. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिओ फेन्सिंग मोबाईल अॅपद्वारे ही तपासणी करण्यात येत आहे.या अभियानात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी होणार असून, जलस्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)सह पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर रासायनिक तपासणी अभियान व स्वच्छता सर्वेक्षण राबविले जाते. यंदा पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षण व रासायनिक तपासणी अभियानास १ एप्रिलपासून सुरूवात झाली. ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी जिओ फेन्सिंग मोबाईल अॅपद्वारे केली जात आहे. या अॅपची निर्मिती ‘एमआरएसएसी’नागपूर मार्फत करण्यात आली आहे. हे अभियान राबविण्याचे हे तिसरे वर्ष आहे.या अभियानात जलसुरक्षक यांनी गावातल सार्वजनिक जलस्त्रोतांचे नमुने घ्यायचे आहेत. यासाठी त्यांना ग्रामसेवक व आरोग्यसेवक सहकार्य करणार आहेत.घेतलेले नमुने भुजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा व उपजिल्हा स्तरावरील धुळे, दोंडाईचा व शिरपूर प्रयोगशाळांमध्ये तपासले जाणार आहेत. या अभियानाबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत. अभियानाच्या यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असून, जिल्हा व तालुका कक्षातील तज्ज्ञ, सल्लागार परिश्रम घेत आहेत.
धुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 4:50 PM
ग्रामीण भागातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची करणार तपासणी
ठळक मुद्दे१ एप्रिलपासून जलस्त्रोत तपासणीस सुरूवातजिल्ह्यातील २ हजार ८५० जलस्त्रोतांची तपासणी करणारप्रगोग शाळेत होणार तपासणी