लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खड्ड्यात पडून त्यातील पाण्यात बुडाल्याने एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना देवपुरातील एकवीरादेवी नगरात शनिवारी दुपारी घडली़ एकुलत्या मुलाच्या मृत्यूमुळे शिराळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला़ नकाणे रोडवरील एकविरादेवी नगरच्या मागील बाजूस पांझरा नदी किनारी एका वस्तीत शामा शिराळे आपल्या परिवारासोबत राहतात. त्यांना ४ मुली आणि १ मुलगा आहे़ दगडापासून पाटा-वरवंटा तयार करुन त्याची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे़ शिवाय तालुक्यातील शिरुड येथेही शिराळे पत्नीसोबत कामास जातात़ शनिवारीही ते शिरुड येथेच गेले होते़शनिवारी दुपारी कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत टायर खेळत होता़ खेळता खेळता तो पांझरा नदी किनारी असलेल्या रस्ता कामाच्या ठिकाणी गेला़ त्या ठिकाणी खड्ड्यात पाणी असल्याने कृष्णा त्यात पडला़ गाळ असल्याने त्याला बाहेर निघता आले नाही़ परिणामी त्याचा बुडून मृत्यू झाला़ घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी धाव घेत त्याला खड्ड्यातून बाहेर काढले़ परंतु तोपर्यंत कृष्णाचा मृत्यू झाला होता. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड आणि पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़
धुळ्यात खड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 8:40 PM
एकुलता : देवपुरातील एकवीरादेवी नगरातील घटना
ठळक मुद्देकृष्णा हा शिराळे परिवाराचा एकुलता एक मुलगा होता़ चार बहिणीच्या पाठी झाल्यामुळे सर्वांचा तो आवडता होता़त्याच्या निधनामुळे पसरली शोककळा़