लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर सीबीएसई स्कूलच्या चिमुकल्यांनी येथील पोलिस ठाण्यात भेट देवून कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली़किसान विद्या प्रसारक संस्था संचालित के.व्ही.टी.आर. सी.बी.एस.ई. स्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक भेट कार्यक्रमअंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. सदर शैक्षणिक भेटीत पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला़ तसेच पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, कार्यपद्धती तसेच पोलीस खात्याचे महत्व व इतर सामाजिक विषयाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलिस निरीक्षक संजय सानप यांचा सत्कार केला़ तसेच संपूर्ण पोलीस कार्मचारी यांचे आभार मानले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रसन्ना मोहन व शालेय शिक्षक उपस्थित होते.
चिमुकल्यांनी जाणून घेतले पोलिस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 6:06 PM