लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश ग्राहकमंचाने देवूनही रक्कम न दिल्याप्रकरणी चिंतामणी पतसंस्थेचे चेअरमन आऱ बी़ अग्रवाल आणि सरव्यवस्थापक अनिल मोहन अग्रवाल यांना २ वर्षाचा सश्रम कारावास सोमवारी ठोठावला़ हा निकाल धुळे ग्राहक मंचाच्या पिठाने दिला़ शहरातील चिंतामणी पतसंस्थेत २००३ पुर्वी ४ लाख ४० हजाराच्या ठेवी आणि पतसंस्थेच्या बचत खात्यात ५ हजार ९० रुपये अशी रक्कम ठेवली होती़ मुदत संपल्यानंतर ही रक्कम ठेवीदाराला परत मिळणे अपेक्षित होते़ परंतु रक्कम देण्यास असमर्थतता दर्शविण्यात आली होती़ वारंवार तगादा लावूनही रक्कम मिळत नसल्याने तक्रारदार संजय बाळकृष्ण खानकरी आणि घरातील इतरांनी धुळे ग्राहक मंचाकडे २००८ मध्ये तक्रार दाखल केली़ त्यानंतर ग्राहक मंचाने सन २००८ मध्ये ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश पतसंस्थेचे चेअरमन व सरव्यवस्थापक यांना दिले होते. या निकालाच्या विरोधात आऱ बी़ अग्रवाल यांनी औरंगाबाद आणि दिल्लीपर्यंत दाद मागितली़ पण, त्याचा काही उपयोग झालेला नाही़ दरम्यान, आदेश देऊनही ठेवी परत मिळत नसल्याबद्दल ग्राहक मंचकडे ठेवीदारांनी तक्रार केली. त्यानुसार ठेवी परत करण्याचे आदेश देवूनही रक्कम दिली नाही़ आदेशाचे उल्लंघन केले म्हणून धुळे ग्राहक मंचाच्या व्हि़ व्हि़ दाणी आणि संजय जोशी यांच्या खंडपिठाने सोमवारी शिक्षेचा निकाल दिला़ त्यानुसार, आऱ बी़ अग्रवाल आणि अनिल अग्रवाल यांना २ वर्षाचा सश्रम कारावास आणि १० हजाराचा दंड दिला आहे़ दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे़तक्रारदाराकडून अॅड़ प्रशांत खानकरी यांनी कामकाज पाहीले़ ठेवींची रक्कम व्याजासह आता सुमारे ९ लाख इतकी होत आहे़
चिंतामणी पतसंस्था चेअरमनला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 5:44 PM
धुळे ग्राहक मंच : दंडही ठोठावला
ठळक मुद्देचिंतामणी पतसंस्थेच्या चेअरमनसह सरव्यवस्थापकाला शिक्षाठेवी परत देण्याचे आदेश देवूनही कार्यवाही केली नाहीदोन वर्षाच्या सश्रम कारावासासह ठोठावला दंड