लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील चितोड गावातील यात्रेत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये बुधवारी दुपारी हाणामारीची घटना घडली़ यात सर्रासपणे कुºहाडीसह धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ यात ८ जण जखमी झाले असून १० जणांविरुध्द धुळे तालुका पोलिसात रात्रीच गुन्हा दाखल नोंदविण्यात आला़ रजूबाई उत्तम सोनवणे (४५, रा़ चितोड) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन १५ दिवसांपुर्वी गावात झालेल्या यात्रेत भांडण झाले होते़ त्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व धमकी देतात़ याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्याचा राग येऊन नरेंद्र भगवान मोरे, शिवा भगवान मोरे, समाधान शरद मोरे या संशयितांसह अन्य दोन जण (सर्व रा़ चितोड) यांनी बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रजूबाई सोनवणे यांच्या घरात घुसले़ त्यांनी लाकडी दांडक्याने, हाताबुक्यांनी रजूबाईसह पती उत्तम गुलाब सोनवणे व दोघा मुलांना मारहाण केली़ उत्तम सोनवणे यांच्या खिशातून १५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले़ मारहाणीत रजूबाईसह उत्तम सोनवणे, महेंद्र सोनवणे, दिनेश सोनवणे हे चौघे जखमी झाले आहेत़ याप्रकरणी नरेंद्र मोरे सह ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणात दुसरी फिर्याद वंदनाबाई भगवान मोरे (४८, रा़ चितोड) या महिलेने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, वंदनाबाई यांच्या मालकीची बकरी दिनेश उत्तम सोनवणे हा हाकलून घेऊन गेला होता़ त्याबद्दल त्याला विचारपूस केली असता त्याचे त्याला वाईट वाटले़ त्यानंतर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिनेश उत्तम सोनवणे, उत्तम गुलाब सोनवणे, महेंद्र उत्तम सोनवणे, रजूबाई उत्तम सोनवणे यांनी वाद घातला़ शिवीगा केली़ हाताबुक्यांनी मारहाण केली़ वंदनाबाईला सोडविण्यासाठी तिचा पती भगवान रामसिंग मोरे, नरेश भगवान मोरे, उषाबाई भगवान मोरे, समाधान शरद गायकवाड हे आले असता त्यांना कुºहाड, लोखंडी पाईप व भाला यांच्या सहाय्याने मारहाण केली़ त्यात या पाचही जणांना दुखापत झाली़ यावरुन दिनेश सोनवणेसह ५ जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ गावात तणावाचे वातावरण आहे़
चितोडला दोन गट आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 9:46 PM