धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आयएमए व वडार समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आल़े तर दुसरीकडे गळफास घेतलेल्या तरुणाचे बुधवारी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल़े या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरू केला आह़ेहिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ़ रोहन म्हामुनकर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली होती़ या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी आयएमए संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ डॉक्टरला मारहाण करणा:या उर्वरित आरोपींना अटक करावी, हिरे महाविद्यालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या़ तर दुसरीकडे वडार समाजानेही जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केल़े दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी समाजातर्फे करण्यात आली़ पोलीस ठाण्याच्या ‘लॉक-अप’मध्ये आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आल़े या घटनेच्या चौकशीला बुधवारी सीआयडीने सुरुवात केली़ नाशिक येथील सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड धुळ्यात दाखल झाले होते, त्यांनी घटनास्थळासह विविध बाबींची तपासणी केली़ जखमी डॉक्टरांवर मुंबईत उपचार सुरू मुंबईतील खासगी रुग्णालयात जखमी डॉ. रोहन म्हामुनकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी त्यांच्याशी अथवा त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एम. गुप्ता यांनी सांगितले.
सीआयडीचा ‘तपास’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 11:57 PM