लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळयात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत़ सद्यस्थिती पेट्रोल-डिझेलचे दर नव्वदीच्या उंबरठ्यावर असून लवकरच नव्वदी पार होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ देशभरात इंधन दरवाढीवरून ओरड सुरू असली तरी दरवाढीचे मीटर थांबण्यास तयार नाही़ त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांसह अन्य विविध क्षेत्रांना बसत आहे़ धुळयात शनिवारी पेट्रोलचा दर ८९़७५ पैसे होता तर डिझेलचा दर ७७़१३ प्रतिलिटर होता़ सरकारने गेल्या वर्षी पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार दर दररोज बदलत असून त्यात काही पैशांची भर पडत आहे़ सततच्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत़ शहरातील वेगवेगळया पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलच्या दरात काही पैशांचा फरक आहे़ कंपन्यांकडून बदलले जाणारे पेट्रोल व डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात़ इंधन डेपोपासून पेट्रोलपंपाचे अंतर जितके अधिक तितके दरही अधिक असतात़ त्यातच काही पेट्रोलपंपांवर मापात पाप केले जात असल्याची ओरड वाहनधारकांकडून होत असून त्यामुळे महागाईची झळ अधिकच तीव्रतेने बसते़
धुळे शहरात पेट्रोल नव्वदीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:02 PM
दरवाढीचे मीटर वाढतेच : प्रतिलिटर मोजावे लागताहेत ८९़७५ रूपये, डिझेलही ७७ पार
ठळक मुद्देशहरातील एसआरपी पेट्रोलपंपावर शनिवारी पेट्रोलचा दर ८९़७५, वाडीभोकर रोडवरील सिस्टेल पेट्रोलपंपावर ८९़७१ व रामनगर पेट्रोलपंपावर ८९़६९ रूपये प्रतिलिटर होता़ तर डिझेलचा दर अनुक्रमे ७७़१९, ७७़१३ व ७७़११ इतका नोंदविण्यात आला़जिल्ह्यात विविध कंपन्यांचे १५६ पेट्रोल पंप आहेत़ त्यात भारत पेट्रोलियमचे ४५, इंडियन आॅइलचे ७५ आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे ३६ पेट्रोल पंप आहेत़ याशिवाय एसआरपीएफचे २, कंपन्या स्वत: चालवित असलेले २ आणि पोलीस विभागाचा १ पेट्रोल पंप आहे़ या सर्व पेट्रोल पंपांव