धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर वाहनांची कागदपत्रे तपासणी करताना एका ट्रकचालकाच्या पायाच्या पंजावरून पोलीस वाहन गेल्याने गोंधळ उडाला़ मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला़ यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती़ मोहाडी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला़ चाळीसगाव चौफुलीवर 14 फेबुवारी रोजी सायंकाळी महामार्ग पोलीस वाहनांची कागदपत्रे तपासणी करत होत़े त्यात पोलिसांनी एका ट्रकचालकाची कागदपत्रे तपासणी करताना त्या चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली़ त्यानंतर पोलिसांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन त्या ट्रकचालकाला चौकीत बोलावल़े पोलीस जीप घेऊन जात असताना ती त्या ट्रकचालकाच्या पायाच्या पंजावरून गेल्याची ओरड करीत ट्रकचालक रस्त्याच्या बाजूला जाऊन बसला़ त्याचवेळी एका गॅरेजवरील व्यक्तीने वाहन भररस्त्यात उभे केल्याने वाहतूक ठप्प झाली़ ट्रकचालकाने पोलिसांवर आरोप करत चांगलाच आकांडतांडव केला़ या प्रकारामुळे महामार्ग पोलीस गोंधळात पडले होत़े यावेळी नागरिकांनीही गर्दी केली़ मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्रकचालकाला समजावल़े तसेच वाहतूकही सुरळीत केली़ नंतर ट्रकचालकाला रुग्णालयात नेल़े या प्रकारामुळे अर्धर्ा तास वाहतूक ठप्प झाली होती़ याबाबत उशिरार्पयत पोलिसात नोंद झालेली नव्हती़ ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचीही चर्चा होती़
ट्रकचालकाच्या पायावरून पोलीस जीप गेल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 12:00 AM