लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : डीजेवरील गाण्यावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शहरातील जुने धुळे भागात दुपारी उशिरा घडली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आझादनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ यावेळी जमावाकरुन एका दुचाकीची तोडफोडही झाली आहे़ दरवर्षाप्रमाणे यंदाही कानुबाई मातेचा उत्सव जुने धुळे भागात उत्साहाने साजरा करण्यात आला़ रविवारी प्रतिष्ठापना केल्यानंतर सोमवारी दुपारी कानुबाई मातेच्या मुर्तीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली़ यावेळी डीजेचे वाद्य लावण्यात आले होते़ दुसºया गटाकडून मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणाव निर्माण झाला़ घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते़ यावेळी जमावाकडून एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
धुळ्यात कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 6:34 PM
जुने धुळे भागातील घटना : पोलिसांचा बंदोबस्त तैनात
ठळक मुद्देजुने धुळे भागातील घटनादोन गट आमने सामने भिडलेपोलिसांचा बंदोबस्त तैनात