लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपाचे नवनिर्वाचित महापौर चंद्रकांत सोनार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘धुळमुक्त धुळे’ या मोहिमेचा पहिल्या टप्प्याचा आज समारोप होणार आहे़ या मोहिमेत रिकाम्या प्लॉट्सवरील झाडेझुडूपे व कचरा साफ करण्यात आला़ प्रभाग १९ सह हद्दवाढीतील गावांमध्ये ही मोहीम मंगळवारी राबविण्यात येणार आहे़या स्वच्छता अभियानांतर्गत सोमवारी प्रभाग क्रमांक ११, १२ व १३ मध्ये कॉटन मार्केट ते उड्डाण पुलापर्यंत, पवननगर, रामनगर, अंबिका नगर, विक्रम नगर, नवनाथ नगर, अरिहंत मंगल कार्यालय, अभय कॉलेज परिसर, मार्केट परिसर, चंद्रमनी चौक, अक्सा नगर, भंगार बाजार, काजी प्लॉट, गफ्फूर नगर, फिरदोस नगर, नजम नगर, शिवाजी नगर, मौलवीगंज, अन्सार नगर, दिलदार नगर, अमर नगर, आंबेडकर नगर, शाळा नं २०, ऐंशीफुटी रोड, जयशंकर कॉलनी, आझाद नगर परिसर, कबीर गंज, जनता सोसायटी, गजानन कॉलनी, कामगार नगर, हजार खोली, बंदे नवाज नगर या भागात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली़ या मोहिमेत ९ ट्रॅक्टरव्दारे ११ मेट्रिक टन कचरा, माती उचलण्यात आली तसेच रिकाम्या प्लॉट्सवरील झाडुझुडूपे हटविण्यात आली़ या मोहिमेत उपमहापौर कल्याणी अंपळकर व नगरसेवक सहभागी झाले़
रिकाम्या प्लॉट्सवरील कचरा साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 10:10 PM