धुळे : महापालिकेने स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांवर भर देण्यास सुरुवात केली आह़े 20 जानेवारीला केंद्रीय समितीकडून होणारी पाहणी व 26 जानेवारीला शहर हगणदरीमुक्तीची घोषणा या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेचा संकल्प करीत महापालिकेने समृध्दीचा ध्यास घेतला आह़े प्रशासनाचे प्रयत्नशहरात स्वच्छताविषयक अनेक उपक्रम दोन वर्षापासून राबविले जात आहेत़ सरकारने 4 जानेवारीपासून सुरू केलेल्या स्वच्छ सव्रेक्षण 2017 या उपक्रमांतर्गत स्वच्छतेबाबत विविध उपाययोजना मनपाला कराव्या लागणार आहेत़ त्या आनुषंगाने मनपा प्रशासनाने सातत्याने अधिका:यांच्या बैठका घेऊन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़ स्वच्छ सव्रेक्षणांतर्गत मनपातर्फे स्वच्छता कर्मचा:यांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने घेणे, रस्त्यांवर दिवसातून दोन वेळा झाडलोट करणे, दुकाने व बाजारपेठेतील कचरा संकलन, घरोघरी, तसेच मंगल कार्यालयांमधून कचरा संकलन, कचराकुंडय़ांची उपलब्धता, व्यावसायिक क्षेत्रांमधील कच:याचे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण, निवासी क्षेत्रांमध्ये एकदा झाडलोट व स्वच्छता, कचराकुंडीमुक्ती यासह उपाययोजना करण्यात येणार असून त्यानुषंगाने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ मनपाकडून राबविल्या जाणा:या उपक्रमांना केंद्र सरकारची पाहणी करून गुणांकन करणार आह़े हगणदरीमुक्तीवर भरआतार्पयत मनपा प्रशासनाने शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून अनेकांना पोलिसांच्या ताब्यात दिले आह़े मनपाचे पथक दररोज नदीपात्र व हगणदरीयुक्त भागात फिरून ते हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आह़े आतार्पयत 100 पेक्षा अधिक नागरिकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आह़े हगणदरीयुक्त 44 पैकी 30 स्थळे हगणदरीमुक्त झाल्याचे मनपाने स्पष्ट केले आह़े तसेच जनजागृती करण्यासाठी 25 ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत़ तसेच सर्व सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आह़ेतक्रारींचे होणार निराकरण
100 टक्के निधी खर्च़़़4शहर स्वच्छतेसाठी मनपाला प्राप्त झालेला निधी 100 टक्के खर्च झाला आह़े वैयक्तिक शौचालयांसाठी 4 हजार 740 इतके उद्दिष्ट होते, 3 हजार 826 अर्ज प्राप्त झाले असून आतार्पयत 3 हजार 400 पेक्षा अधिक वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण झाले आह़े त्यावर 3 कोटी 32 लाख रुपयांचा खर्च झाला आह़े तर वर्षभरात मनपा प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत 71 उपक्रम राबविण्यात आले असून त्यात 1 लाख 60 हजार नागरिक सहभागी झाले आहेत़स्वच्छतेबाबत येणा:या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपले सरकार, स्वच्छता अॅपबरोबरच आता टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आह़े 18002333010 या क्रमांकावर प्राप्त होणा:या तक्रारींचे निराकरण 12 तासांच्या आत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आह़े स्वच्छतेत सर्वोच्च नामांकन मिळावे यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आह़े