आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्ह्यातील १५० गावांमध्ये एलईडी व्हॅनद्वारे पाणी व स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. शाश्वत स्वच्छतेसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजनांच्या प्रचारासाठी शासनाकडून एलईडी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या व्हॅनला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.उपस्थित होत्या.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने धुळे जिल्हयातील १५० ग्रामपंचायतींमध्ये या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. धुळे व साक्री तालुक्यातील प्रत्येकी ४० तर शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी ३५ ग्रामपंचायतींमध्ये दररोज सकाळी व सायंकाळी दोन सत्रात जनजागृती करण्यात येणार आहे.यावेळी बोलतांना संजय बागूल म्हणाले की, जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी आता शाश्वत स्वच्छता आवश्यक आहे.या शुभारंभाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोेदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, संध्या शिलवंत आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील तज्ज्ञ व सल्लागार उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यातील१५० गावांमध्ये होणार स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:54 AM