लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दिव्यांगांनाही शिक्षणाची आवड असते. मात्र अपंगत्वामुळे ते स्वत: घरापासून शाळेपर्यंत जाऊ शकत नाही. अशा जिल्ह्यातील १५४ पैकी १४६ दिव्यांगाना मदतनीस मिळाल्याने, ते शिक्षण पूर्ण करू शकत आहे. या मदतनीसांना शासनामार्फत दरमहा २५० रूपये भत्ता दिला जातो. या मदतनीसांसाठी ३ लाख ६५ हजार रूपयांचा निधी दिला जातो. तर जिल्ह्यातील १८ दिव्यांग विद्यार्थी प्रवास करतात. त्यांनाही २५० रूपयांप्रमाणेच भत्ता दिला जातो. त्यासाठी ४५ हजाराची तरतूद आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यावर्षी एकूण ४ लाख १० हजार रूपयांची समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत तरतूद केली आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी यासाठी लाभार्थी असतात. विद्यार्थी हा ४० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असणे गरजेचे आहे. गावात दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शाळा उपलब्ध नसल्यास, दुसºया गावातील शाळेत जाण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्याला मदतनीस दिला जातो.मदतनीसांना भत्ताजिल्हा शल्य चिकित्सकांच्या तज्ज्ञांनी व विशेष शिक्षकांनी शिफारस केलेल्या विशेष गरजा असणाºया विद्यार्थ्यांना शाळेत नियमित ये-जा करण्यासाठी मदत करणाºया मदतनीसांना हा भत्ता देण्यात येतो. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण, वॉर्ड शिक्षण समितीने नियुक्त केलेल्या बेरोजगार व्यक्तीस २५० रूपये प्रतिमहा प्रोत्साहानात्मक भत्ता देण्यात येतो. ७५ टक्के उपस्थिती आवश्यकमदतनीस भत्त्यासाठी संबंधित विद्यार्थी शाळेत ७५ टक्के उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी मदतनिसाची व्यवस्था नसल्यास शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समितीच्या शिफारशीने स्वयंसेवकाची नेमणूक करता येते. दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्याला शाळेत सोडण्याचे काम घरातील व्यक्ती करीत असेल, त्यास मदतनीस भत्ता देण्यात येत नाही.तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या अशी-धुळे-४३, शिरपूर-४९, शिंदखेडा-३९ व साक्री तालुक्यातील २३ विद्यार्थ्यांचा याचा लाभ मिळतो.मुलींची संख्या कमीचमुलींसाठी शासकीय सेवा सवलती योजनेअंतर्गत मोफत बस पास दिला जातो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाºया मुलींची संख्या नगण्य आहे. जिल्ह्यात फक्त ४८ मुलींना मदतनीस देण्यात आले आहेत. प्रवास करणाºया दिव्यांगाची संख्या जिल्ह्यात १८ एवढी आहे. त्यांनाही प्रतिमहा २५० रूपये भत्ता दिला जातो.शिक्षण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणगटस्तरावरून विशेष शिक्षक व तालुका विषयतज्ज्ञ यांच्यामार्फत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. हा भत्ता १६ जून २०१७ ते १५ एप्रिल २०१८ अशा १० महिन्याच्या कालावधीसाठी दिला जातो.पालकांमध्ये सुरक्षेची जाणीवदिव्यांग विद्यार्थ्यांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. अशाप्रकारे भत्ते दिल्यास परिणामी पालकांमध्ये परिस्थितीची व सुरक्षेची जाणीव निर्माण होऊन जास्तीत-जास्त अपंग विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यास मदत होत आहे.
धुळे जिल्ह्यातील १४६ दिव्यागांना शिक्षणासाठी मदतनीसांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:34 AM
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत मदतनीसांना २५० प्रतिमहा दिला जातो भत्ता
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात १५४ पैकी १४६ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मदतनीसमदतनीसांना दिला जातो प्रतिमहा २५० रूपये भत्ता१८ दिव्यांग विद्यार्थी करतात प्रवास