ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.18- उभ्या बसला मागून येणा:या भरधाव ट्रकने धडक दिलेल्या बस वाहक व प्रवासी असे दोघे ठार झाल़े हा अपघात रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा गावाजवळ घडला आह़े
बस वाहक नदीम खान अन्वरखान पठाण (वय 27 रा़ पाळधी जि़ जळगाव) व प्रवासी महमद अक्रमशेख उस्मान शेख (वय 42 रा़ बुलढाणा) अशी दोघांची नावे आहेत़ जळगाव येथील बसचे टायर पुरमेपाडा गावाजवळ पंर झाल़े त्यामुळे रविवारी पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास बसचे टायर बदलण्याचे काम सुरू होत़े त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणा:या ट्रकने बसला धडक दिली़ त्यात दोघे ठार झाल़े दोघांना टोल नाक्यावरील रूग्णावाहीकेव्दारे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े तेथे डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषीत केल़े