धुळे : शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पर्जन्यमान लांबणीवर पडल्यास भविष्यात नागरिकांना पाण्याची अडचण येऊ नये, यासाठी हरण्यामाळ तलावातून नकाने तलावात ४० दलघफु पाणी सोडण्यात येत आहे़ त्यापैकी १५ दलघफु पाणी नकाणे तलावात संकलित झाले आहे़शहरातील सुमारे एक ते सव्वा लाख लोकवस्तीला नकाने तलावातील पाण्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो़ नकाने तलावातून हनुमान टेकडी, सिमेंट जलकुंभ, रामनगर, कुमारनगर, अशोकनगर आदी जलकुंभाव्दारे बहूसंख्य भागात पाणीपुरवठा केला जातो़ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच जलस्त्रोताची पाण्याची पातळी खालवली आहे़ नकाने तलावातील जलसाठ्यातील जलसाठा कमी झाल्याने पाणी वितरणात परिणाम झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहे़ पावसाळा उशिरा आगमन होणार असल्याने उपलब्ध जलसाठ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी मनपाकडून उपाययोजना म्हणून व हरण्यामाळ तलावातून नकाणे तलाव भरण्यासाठी सुरूवात झाली आहे़ सध्यास्थितीत १५ दलघफु जलसाठा नकाणे तलावात संग्रहित झाला आहे़ हरण्यामाळ तलावातील ४० दलघफुपर्यतच्या जलसाठ्यातून जुनपर्यत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ याबाबत महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी तलावाची पाहणी केली़
नकाणे तलावात पंधरा दलघफू जलसाठा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 7:49 PM