लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची नाव नोंदणी, वगळणी व दुरुस्ती करण्याच्या कामासाठी बीएलओंनी गृहभेटी द्याव्यात, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत १ आॅक्टोबर ते ११ डिसेंबर याकालावधीत बीएलओंनी जिल्ह्यात १२ हजार २५० मतदारांचे अर्ज संकलित केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत आॅनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३ हजार ५४५ मतदारांनी आॅनलाइन पद्धतीने तर आॅफलाइन ८ हजार ७०५ मतदारांचे अर्ज बीएलओंनी गृहभेटींद्वारे संकलित केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची डाटा एन्ट्री ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला हा कार्यक्रम १ ते ३१ आॅक्टोबर याकालावधीसाठी होता. परंतु, निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम १५ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवावा, असे सांगितले होते. मात्र, त्यानुसार उद्या, शुक्रवारपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. अंतिम दोन दिवस विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या मतदारांची नावे ही मतदार यादीत नाही; किंवा मतदार यादीतील नावे दुरुस्त करायची आहे, त्यांनी दोन दिवसात बीएलओंशी संपर्क साधून नाव नोंदणी, दुरुस्ती करून घ्यावी; असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील बीएलओ हे त्यांनी केलेल्या कामाचे दप्तर हे जिल्हा निवडणूक शाखेत सादर करणार आहेत. शिक्षक मतदार नोंदणीसाठी २१ डिसेंबरपर्यंत मुदत भारत निवडणूक आयोगाने जुनी शिक्षक मतदार यादी रद्द करून नव्याने शिक्षक मतदार यादी तयार करावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात ७ हजार ४२४ शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यानुसार २१ नोव्हेंबरला शिक्षक मतदार संघाची प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यानंतर शिक्षक मतदारांना नाव नोंदणीसाठी आयोगाने पुन्हा २१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने जिल्ह्यात १९४ शिक्षकांनी नोंदणी केली आहे.
१,६३० बीएलओंनी २ लाख घरांना दिल्या भेटी
४मतदारांची नाव नोंदणी, दुरुस्ती, मयत मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी जिल्ह्यातील १,६३० बीएलओंनी ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार २२६ मतदारांच्या घरी भेटी दिल्या.४ त्यानुसार ज्या मतदारांचे नाव यादीत नाही; अशा १० हजार १३ मतदारांची नावे संकलित करून घेतली. ४या नावांपैकी २ हजार ६८७ नावे ही बीएलओंनी ‘बीएलओ अॅप’ या माध्यमातून तर उर्वरीत ७ हजार ३२६ नावे ही प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेटी देऊन संकलित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.