धुळे : तालुक्यातील लामकानी गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. चक्क डुप्लिकेट पावती पुस्तक वापरून ग्रामपंचायतीच्या लिपिकाने ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली करत ६२ हजार ७६२ रुपयांची शासनाची फसवणूक केली. ही घटना २०१८-१९ या वर्षातील आहे. चौकशीतून ही बाब समोर आल्याने सोनगीर पोलिस ठाण्यात संशयित लिपिक पांडुरंग झिपरू जगताप (वय ४८, रा. लामकानी) याच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील सामोडे येथील ग्रामविकास अधिकारी बाजीराव दादाजी जगताप यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, लामकानी येथील पांडुरंग झिपरू जगताप यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या लिपिकपदाची जबाबदारी होती.
त्यांनी ग्रामपंचायतीच्या नावाचा गैरवापर करून घरपट्टी आणि पाणीपट्टीची बनावट पावती पुस्तक छापले. त्यानंतर २०१८-१९ या वर्षातील नागरिकांकडे बनावट पावत्या देऊन त्यांच्याकडून घरपट्टी आणि पाणीपट्टीची बेकायदेशीर वसुली केली. पैसे घेऊन त्यांना खोट्या पावत्या दिल्या. जमा झालेला पैसा त्यांनी ग्रामपंचायतीत न भरता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर केला.
पैसे भरून देखील पुन्हा थकबाकीची नाेटीस नागरिकांनाफ त्यात लामकानी येथील पांडुरंग झिपरू जगताप या लिपिकाचे नाव समोर आले. त्याच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.