लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्टÑीयकृत बॅँकामार्फत शेतकºयांची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा शिंदखेडा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे हे काही शेतकºयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी व त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. परिणामी, संतप्त शेतकरी व सोनवणे यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. परिस्थिती चिघळू नये, म्हणून जिल्हाधिकाºयांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दोन वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. परिणामी, अनेक शेतकरी पुनर्गठीत कर्जासाठी बॅँकांच्या फेºया मारत होते. परंतु, राष्टÑीयकृत बॅँकांनी शेतकºयांना दाद दिली नाही. त्यात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर एसबीआय बॅँकेने शेतकºयांना विश्वासनात न घेता परस्पर पुनर्गठीत कर्जामध्ये टाकले. त्यातून शेतकºयांना वगळावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी घेतली भेट राष्टÑीयकृत बॅँकांचा हुकूमशाही कारभार थांबविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाºयांना चर्चेसाठी बोलवून शेतकºयांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोनवणे व शेतकरी हे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. परंतु, आरबीआयचे अधिकारी न आल्यामुळे सोनवणे व शेतकरी संतप्त झाले. ही काय पद्धत झाली का?आरबीआयच्या अधिकाºयांना तत्काळ बैठकीला बोलवा? अशी मागणी शानाभाऊ सोनवणे यांनी लावून धरत चक्क जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या खूर्चीसमोरच ठिय्या मांडला. त्यावेळी ‘ही काय पद्धत झाली काय’? असे जिल्हाधिकारी आंदोलनकर्त्यांना म्हणाले. त्यानंतर शानाभाऊ यांनी आवाज वाढविण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर देताना पुन्हा जिल्हाधिकारी यांनी त्यांना आवाज खाली करा? असे म्हटले. त्यानंतर सोनवणे यांनी ही लोकशाही आहे, असे सांगितले. लोकशाही असली तर ही काय आवाज वाढविण्याची पद्धत झाली काय? असे जिल्हाधिकाºयांनी सांगताच त्यांच्या दालनातील वातावरण चांगलेच तापले. तत्काळ जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले.अन् आंदोलनकर्ते झाले शांत जिल्हाधिकारी दालनात पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना उठवून खूर्चीवर बसविले. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनीही आरबीआयच्या अधिकाºयांशी संपर्क साधला. राष्टÑीयकृत बॅँकांमध्ये शेतकºयांना अडचणी येत असून त्यासंदर्भात चर्चा करायची आहे, असे सांगत सोमवारी दुपारी चार वाजता बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविले आहे. त्यानुसार सोमवारी होणाºया बैठकीत शेतकºयांना येणाºया अडचणींबाबत चर्चा केली जाणार असून त्या सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन गेलो होते. राष्टÑीयकृत बॅँकाकडून शेतकºयांची होणारी पिळवून थांबविण्यासाठी आरबीआयच्या अधिकाºयांशी आज चर्चा करणार असे ठरले होते. परंतु, अधिकारी आलेच नाही. त्यामुळे दालनात ठिय्या आंदोलन करावे लागले. आता या प्रश्नी सोमवारी दुपारी बैठक होणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे. - शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना