संडे स्पेशल मुलाखत देवेंद्र पाठक
धुळे :नक्षलग्रस्त भागात यशस्वी कामगिरी केल्यानंतर विविध जिल्ह्यात कामांचा ठसा उमटवून धुळ्यात अपर पोलीस अधीक्षक या महत्वाच्या पदावर डॉ़ राजू भूजबळ अलीकडेच रूजू झाले आहेत़ संवाद आणि समन्वयातून प्रश्न निकाली निघू शकतात़ त्यातून सकारात्मक वाटचाल होऊ शकते, अशी आशा डॉ़ भुजबळ यांना आहे़ त्यांना आपला पदभार स्विकारुन तब्बल दीड महिना झाला आहे़ त्यांच्याशी पोलिसांविषयी ‘लोकमत’ने संवाद साधला़ प्रश्न : धुळ्यात रुजू झाल्यानंतरचा आपला आजवरचा अनुभव कसा राहिला आहे?डॉ़ भूजबळ : धुळे शहर तसे चांगलेच आहे़ नवीन असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील क्राईमसंदर्भातील अभ्यास करत आहे़ गुन्हेगारांचा बेसिक मुद्दा समजून घेत तो निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ प्रश्न : नक्षलग्रस्त भागात काम केल्यानंतर आपला अनुभव कसा राहिला?डॉ़भुजबळ : नक्षलग्रस्त आणि अन्य भाग यांच्यात काम करण्याची पध्दत वेगळीच असते़ क्राईमच्या घटनांपेक्षाा त्या भागात सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने पाहण्यात येते़ अन्य शहरी भागात औद्योगिक आणि शहरी भागाचा विस्तार वाढता असल्यामुळे याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात़ प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी आपणाकडे काही नियोजन आराखडा आहे का?डॉ़ भुजबळ : गुन्हेगारी ही धुळ्याची असो वा कोणत्याही शहराची ती मोडीत काढण्याची जबाबदार यशस्वीपणे सांभाळणे फारच महत्वाचे आहे़ गुन्हे, घटना लक्षात घेऊन वातावरणानुसार त्याची सोडवणूक केली जाणे फार महत्वाचे आहे़ शहराबद्दलची माहिती येथे येण्यापूर्वी संकलित केली आहे़ आता नव्यानेच पदभार स्विकारला आहे़ येथील क्राईमसंदर्भातील घटना, घडमोडी समजून घेत न्याय देण्याचा प्रयत्न राहिल़
संघटीत गुन्हे रोखणारव्यक्तिगत वाद आणि त्यातून घडणाºया क्राईमच्या घटना कोणीही रोखू शकत नसलेतरी अन्य क्राईम मात्र रोखण्यासाठी कटाक्ष राहणार आहे़ त्यात प्रामुख्याने संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण केला जाईल़ ती मोडीत कशी काढता येईल याकडे देखील तितक्याच गांभीर्याने पाहिले जाईल़ त्याचे प्रमाण वाढल्यास गुन्हेगारींचे प्रमाण अधिकच वाढू शकते़ त्यामुळे संघटीत गुन्हेगारी कमी करणे, ती वाढू न देणे याची दक्षता घेतील जाईल़ शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले़