लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जनतेला विविध प्रलोभने दाखवित आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि राष्टÑवादीचे अनिल मुंदडा यांनी शनिवारी लेखी स्वरुपात महापालिका निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे़ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे धुळे दौºयावर आले असता त्यांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या. मी मुख्यमंत्र्यांना तीनशे कोटी देण्यास भाग पाडेल, असे प्रलोभनात्मक वक्तव्य केले. तसेच निवडणुकीच्या काळात जो - जो मार्गात येईल त्यांच्या मुंडक्यावर पाय ठेवून पुढे जा आणि सत्ता मिळवा या वक्तव्यामुळे देखील सामाजिक तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे. वरील दोन्ही वक्तव्यांमुळे आदर्श आचार संहितेचा भंग झालेला आहे. याप्रकरणी चौकशी करुन रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.वरील तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे अनिल मुंदडा यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे़ तक्रारीची प्रत ही राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांच्याकडेही पाठविण्यात आली असल्याची माहिती सनेर आणि मुंदडा यांनी यावेळी दिली आहे. मुख्यमंत्र्यांविरुद्धही तक्रार- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वत:च्या आवाजातील एक ध्वनीफित सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आली आहे. नाशिक व धुळे महानगरपालिका क्षेत्रात एम.एन.जी.एल. योजनेअंतर्गत घराघरात स्वच्छ व सुरक्षित गॅस देऊ अशी ध्वनीफित सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सदर मजकूर हा महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला प्रलोभन दाखविणारा असल्यामुळे सदर ध्वनीफितीची चौकशी करुन मुख्यमंत्री यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:34 PM