लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा :तालुक्यातील दरखेडा येथील रेशन दुकानदार बीपीएल,अंतोदय व केशरी कार्ड धारकांना ३५ किलो धान्य देय असतांना देखील ५ ते १० किलो धान्य गावकऱ्यांना देतो. तुमचा थम आला नाही पावती निघत नाही असे वेगवेगळे कारणे देत पावतीही देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.दरखेडा येथे शासन मान्य रेशन दुकान गावातीलच पवार नामक व्यक्ती अनेक वर्षांपासून चालवत आहे. मात्र हा रेशन दुकानदार कधीही कुणाला पूर्ण धान्य देत नाही. लॉकडाऊनच्या काळात मोफत धान्य दिले जाते मात्र तेही थम देऊनही दिले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी उपविभागीय अधीकारी व तहसीलदार यांच्याकडे करून चौकशीची मागणी केली आहे.निवेदनावर गणेश गंगाराम पवार,सजेर्राव पवार विलास युवराज बोरसे,गोपाळ पवार ,भाऊसाहेब मोहन पवार, अमोल भाऊसाहेब पवार यांच्या सह गावातील अनेक नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
रेशन दुकानदाराविरूद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 8:12 PM