दोंडाईचा : येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेली तोडफोड आणि वैद्यकीय अधिकाºयास दमदाटी करणाºया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़येथील उपजिल्हा रुग्णालयात किटकनाशक प्राशन केलेल्या इसमास दाखल करून न घेण्याचा कारणावरुन वैद्यकीय अधिकारी यांना दमदाटी करण्यात आली़ शिवाय कॅबिनच्या काचेचा दरवाजा तोडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरुन दोंडाईचा पोलिसात दोन आरोपीसह इतर अज्ञात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात अतुल राजेंद्र कुंभार याच्या वडिलांनी दारुतून कीटकनाशक प्राशन केल्याने आणले होते. वैद्यकीय अधिकारी कोरोनावर उपचार करीत होते. कुंभार यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल न करून घेण्याचा राग आला आल्याने त्यांचात वाद झाले. अतुल राजेंद्र कुंभार, आकाश दगा कोळी व इतर ८ ते १० जणांनी एकत्र येऊन उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल दुग्गड यांचा अंगावर धावून गेले़ त्यांना दमदाटी केली. त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना धमकावले़ शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अतुल कुंभार याने काचेचा कॅबिनचा काचेचा दरवाजा फोडला, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. विष प्राशन केलेली इसमास कोणालाही न सांगता, कोणतीही कागदपत्रे न घेता घेऊन गेलेत अशी फिर्याद दोंडाईचा पोलिसात देण्यात आली आहे.त्यानुसार संशयित आरोपी अतुल कुंभार, आकाश कोळी सह इतर ८ ते १० जणांविरोधात शासकीय कामात अडथळासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत.
तोडफोड करणाऱ्या जमावाविरुध्द फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:32 PM