शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

दोंडाईचात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:59 PM

कारवाई : वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणीत आढळले नाही 

ठळक मुद्देवैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही सुरु होता व्यवसायफसवणूक करणाºया डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही व्यवसाय करत शासन आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाºया डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ त्याच्याविरोधात दोंडाईचा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ ही कारवाई रविवारी करण्यात आली़ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन बोगस डॉक्टर शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार शहरासह जिल्ह्यात पथक तयार करण्यात आले असल्याने त्यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे़ दोंडाईचा शहरातील सोनार गल्ली येथे विजयकुमार निरापत रॉय (६५) यांचे वास्तव्य आहे़ चांदसी नावाने त्यांनी क्लिनीकदेखील सुरू केलेले आहे़ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांवर वेगवेगळ्या आजारावर उपचार केले जात होते़ या दवाखान्यात सर्व प्रकारच्या चर्मरोगावर उपचार होत होते़ वीर, भगंदर, मूळव्याध, बवासीर, फ्रिस्टल बिना आॅपरेशन उपचार होत होते़ जुना हरताप, संधीवात, गुप्तरोगावर उपचार केले जातील या नावांचे बोर्ड लावून सदर घरांमध्ये विजयकुमार रॉय यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र नसतानाही व्यवसाय सुरू होता़ अधिकृत वैद्यकीय व्यवसायी असल्याचे भासवून त्यासंदर्भात जाहिरात करून शासनाची आणि सर्वसामान्य जनतेची त्यांच्याकडून फसवणूक सुरू होती़ अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना ते मिळून आले़ हा प्रकार रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पथकाकडून छापा टाकून पकडण्यात आला़ याप्रसंगी विजयकुमार रॉय यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पथकाने तपासणी केली असता त्यात बोगसपणा आढळून आला़ याप्रकरणी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ ललितकुमार भारतचंद्र यांनी रविवारी रात्री ११ वाजता दोंडाईचा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित विजयकुमार रॉय यांच्याविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८ सह महाराष्ट्र वैद्यकीय १९६१ चे कलम ३३ (२) तसेच औषधी द्रव्य आणि आक्षेपार्ह जाहिरात अधिनियम १९५४ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक मोरे घटनेचा पुढील तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा