लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्याविरोधात त्यांच्या मुंबईतील वर्सोवा येथील फ्लॅटमधील भाडेकरु महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्याचे समजते. तर १४ महिन्याचे भाडे थकविल्यानंतर घर खाली करुन घेतल्याचा राग आल्याने या महिलेने ही खोटी तक्रार दिल्याची माहिती आमदार काशिराम पावरा यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून दिली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत आमदार पावरा, भाडेकरु आणि पोलीस वादाचे मूळ असलेल्या प्लॅटमध्ये बसून होते.वर्सोवा भागात शासनाकडून आमदार पावरा यांना मियालेल्या फ्लॅट त्यांनी दिनेशकुमार दिवार यांना ४५ भाडयाने दिला होता. मात्र १४ महिने उलटूनही भाडेकरुने एकही महिन्याचे भाडे दिलेले नाही. यासंदर्भात भाडेकरुंना नोटीसही बजावली. परंतु भाडेकरु भाडेही देत नव्हते आणि घरही खाली करत नव्हते.त्यामुळे आमदार पावरा यांनी मंगळवारी दुपारी भाडेकरुंना घराबाहेर काढत कुलूप ठोकले. या घटनेनंतर दिवार दाम्पत्याने वर्सोवा पोलीस स्टेशन गाठत यांच्या पावरा यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्याचे वृत्त आहे.त्यानंतर पोलिसांनी प्लॅटचे कुलूप तोडून भाडेकरुंना प्लॅटमध्ये नेले. त्याठिकाणी आमदार पावरा हे सुद्धा पोहचले. त्यांनीसुद्धा प्लॅटमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडले आणि भाडेकरु महिलेच्या खोट्या तक्रारीची शहानिशा करावी अशी मागणी केली आहे.