धुळे : भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी घेतलेल्या धार्मिक स्थळांविरोधी भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी पुकारलेल्या ‘धुळे बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ बंदवरुन व्यावसायिक व शिवसेना, भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले़ यावरुन १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पांझराकाठच्या रस्त्यांना अडथळा ठरणाºया धार्मिकस्थळांविरोधी भूमिका घेणारे शहराचे आमदार गोटे यांच्या निषेधार्थ शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी धुळे बंदची हाक दिली होती़ बहुतेक प्रमुख भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती़ तर काही व्यावसायिकांनी दुकाने अर्धवट उघडून व्यवहार सुरू ठेवले होते.आग्रारोडवरील पाचकंदील परिसर, चैनीरोड, जे़बी़रोडवर बंदचे आवाहन करणाºया पदाधिकारी व व्यापाºयांमध्ये वाद झाले़ व्यापाºयांनी व्यवहार बंद ठेवण्यास नकार दिल्याने काही ठिकाणी धक्काबुक्कीही झाली़ मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद मिटविले़ याशहर पोलीस चौकीजवळ किरकोळ दगडफेक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांचा फौजफाटा आग्रारोडवर दाखल झाला़ यावेळी बंदचे आवाहन करणाºया कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ या प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर बसेसचा मार्ग बदलण्यात आला होता़
‘धुळे बंद’ला संमिश्र प्रतिसाद, १५ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 6:08 AM