धुळ्यात खान्देशस्तरीय काँग्रेस चिंतन शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:52 PM2018-05-24T22:52:23+5:302018-05-24T22:52:23+5:30
आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हा : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चिंतन शिबिरातून उत्तम कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिले जाते़ तर होणाºया चुका नजरेस आणून त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते़ अशा शिबिरामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते़ विरोधकांची आव्हाने परतवून लावण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खान्देशात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत़ मात्र, त्याकरीता कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा प्रत्येक माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे़ असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळ्यात व्यक्त केले़
धुळे तालुक्यातील नकाणे गावाजवळील दुलारी गार्डन येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षांतर्गत राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्यावतीने पंचायती राज कार्यकर्ता चिंतन शिबिर गेल्या दोन दिवसांपासून सुरु होते़ या शिबिराचा समारोप गुरुवारी झाला़ त्यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी गगनदिप सिंग, विभागीय संयोजक योगेंद्र पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख, माजी खासदार बापू चौरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन पाटील, कल्पना राजपूत, विलास बिरारीस, रजनिकांत कड, लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डॉ़ दरबारसिंग गिरासे, किरण अहिरराव, बापू खैरनार, शिरीष सोनवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्यासह चिंतन शिबिरात धुळ्यासह नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
माजी मंत्री पाटील म्हणाले, चिंतन शिबीरामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले़ त्यांच्या मनगटात बळ निर्माण करण्याचे काम झाले़