शिरपूर : शिरपूर विधानसभा मतदार संघ हा नंदुरबार लोकसभा मतदार संघाला जोडला आहे़ शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या डॉ़हिना गावीत शिरपूर तालुक्यातून ४९ हजार १०३ मताधिक्य मिळून विजयी झाल्या. यंदा मात्र भाजप व काँग्रेसमध्ये सरळ व चुरशीची लढत होणार आहे.शिरपूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, बाजार समिती या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गत लोकसभेच्या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल हे स्वत: धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत होते. ती संधी साधून शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने ४९ हजाराचे मताधिक्य मिळविले होते़ मात्र यंदा आमदार अमरिशभाई पटेल हे स्वत: उमेदवारी करीत नाही. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्यावर धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली असल्याने दोन्ही मतदार संघावर आतापासूनच ते स्वत: लक्ष देत आहे़सन २०१४ आणि २०१९ मधील परिस्थितीमध्ये बराच फरक आहे. तालुक्यावर ३५ वर्षापासून अबाधित राजकीय वर्चस्व ठेवणारे काँग्रेसचे नेते आमदार अमरिशभाई पटेल यांच्यावरच पक्षाने धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघाची पूर्णत: जबाबदारी सोपविली आहे.यावेळेस त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व तरूण नेते तपनभाई पटेल मदतीला असणार आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला मिळणार आहे.दुसरीकडे विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी मतदारसंघात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे केली आहे. तसेच तालुक्यातील आपले वेगळे राजकीय अस्तित्व ठेवणारा पूर्ण रंधे परिवार यंदा भाजपसोबत आहे.त्याचा फायदा आणि तालुक्यातील भाजपाच्या अन्य नेत्यांची मदतही त्यांना मिळणार आहे. एकूणच यंदाची लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणारी लढत ही रंगतदार आणि चुरशीची ठरणार हे निश्चित आहे.पक्षीय बलाबल४जि.प.गट - भाजपा - ०१, राष्ट्रवादी - ००, काँग्रेस - ११, शिवसेना - ००,अपक्ष-१४पंचायत समिती - भाजपा - ०४, राष्ट्रवादी - ०२, शिवसेना - ००, काँग्रेस - १८,अपक्ष-२४कृषी उत्पन्न बाजार समिती - भाजपा - ०१, राष्ट्रवादी - ००, काँग्रेस - १५, सेना-०४नगरपालिका- काँग्रेस -२१, भाजप-७, अपक्ष-२मतदारसंख्या १७ हजाराने वाढली़़़४गत निवडणूकीत पुरूष मतदार १ लाख ५० हजार ७७३ व महिला मतदार १ लाख ४४ हजार ७४५ असे एकूण २ लाख ९५ हजार ४८८ होते़४यंदा पुरूष मतदार १ लाख ५३ हजार २८२ व महिला मतदार १ लाख ५९ हजार २९५ असे एकूण ३ लाख १२ हजार ५७७ इतके झाले आहे़ त्यामुळे गत निवडणूकीपेक्षा यंदा १७ हजार ८९ मतदार अधिक वाढले आहेत़
काँग्रेस-भाजपमध्ये होणार चुरशीची लढत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:01 PM