राफेल खरेदी घोटाळाविरोधात काँग्रेस धुळ्यात एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:04 PM2018-09-14T13:04:37+5:302018-09-14T13:05:51+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : सत्ताधाºयांवर आगपाखड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राफेल खरेदी घोटाळ्याविरोधात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ तंत्रनिकेतन विद्यालयाजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला़ सहभागी पदाधिकाºयांनी सत्ताधाºयांच्या कार्यपध्दतीवर आगपाखड केली़ त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले़
राफेल खरेदी घोटाळाची चौकशी व्हावी यासह अन्य मुद्याच्या अनुषंगाने धुळे जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ सकाळी काँग्रेस भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ मोर्चा राजवाडे बँकेकडून महापालिका मार्गे कमलाबाई चौकापासून तंत्रनिकेतनजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला़ या मोर्चात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी खासदार बापू चौरे, किशोर पाटील, मधुकर गर्दे, रमेश श्रीखंडे, अलोक रघुवंशी, प्रमोद सिसोदे, अरुण पाटील, ईस्माईल पठाण, डॉ़ अनिल भामरे, मुजफ्फर हुसेन, गायत्री जयस्वाल, संगिता देसले, योगिता पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते़
माजी मंत्री थोरात म्हणाले, रॉफेल खरेदी घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी देशपातळीवर आवाज उठविला आहे़ संसदेत त्यांनी यासंदर्भात मनोगत व्यक्त करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती़ यावर विद्यमान पंतप्रधान यांनी समर्पक उत्तरे दिली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला़ नोटाबंदीवरही त्यांनी खरपूस समाचार घेतला़ रोहिदास पाटील, मधुकर गर्दे यांनीही भाषण करुन केंद्र व राज्य सरकारवर टिका केली़ सुत्रसंचालन श्याम सनेर यांनी केले़ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़