नंदुरबार : शहर व तालुक्यातील गोरगरीब शिधापत्रिकाधारक, निराधार योजनांचे लाभार्थी यांना दर महिन्याला दिल्या जाणा:या लाभापासून वंचित राहावे लागत आह़े हा लाभ प्रशासनाने तत्काळ द्यावा आदी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे नंदुरबार तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन आक्रोश आंदोलन करण्यात आल़े आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र मराठे, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू चौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सयाजीराव मोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र लोटन माळी, माजी उपनगराध्यक्ष राजेश परदेशी, पालिकेचे बांधकाम सभापती निखिल रघुवंशी, परवेज खान, कुणाल वसावे, निंबा मोहन माळी, नगरसेवक काशिनाथ चौधरी, नगरसेविका रोशनआरा जियोद्दीन शेख, रसिकलाल पेंढारकर, स्वरूप बोरसे, मोहितसिंग राजपूत, गोपाल शर्मा, मोहन माळी, चंद्रकांत गंगावणे, कैलास पाटील, जाविद धोबी, कमल कडोसे, दीपक दिघे, विलास रघुवंशी, बी़क़ेपाटील, जगन्नाथ पाटील यांच्यासह काँगेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करण्यात येऊन शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार नितीन पाटील यांना निवेदन देण्यात आल़े यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तहसीलदार नितीन पाटील यांना लाभार्थीच्या विविध समस्या सांगितल्या़ काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहर व तालुक्यातील गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य, साखर व रॉकेल या जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने तसेच नव्या शिधापत्रिका मिळण्यातही मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत आह़े लाभार्थीना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकांवर धान्य मिळत नाही़ तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यांची प्रकरणे एक वर्षाच्या कालावधीनंतरही मंजूर झालेली नाहीत़ यामुळे लाभार्थीचे हाल होत आहेत़ या जनतेला शिधापत्रिका, दर महिन्याला धान्य, नवीन शिधापत्रिका एक महिन्याच्या आत द्याव्यात, केशरी कार्डधारकांना दर महिन्याला धान्य, निराधार योजनांच्या प्रकरणांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या़ गेल्या वर्षभरात नंदुरबार तालुक्यातून एक हजार 236 लाभार्थीची विविध प्रकरणे मंजूर केली आहेत़ या लाभार्थीना लाभ मिळावा यासाठी दर महिन्याला अधिका:यांची बैठक घेतली जात आह़े तालुक्यातील निराधार योजनांच्या सहा हजार 906 लाभार्थीना दर महिन्याला लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आह़े -नितीन पाटील, तहसीलदार, नंदुरबाऱ नंदुरबार पालिका घरे देणार - चंद्रकांत रघुवंशी या आंदोलनानंतर बोलताना, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती देताना सांगितले की, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नंदुरबार शहरात स्वत:चे घर नसलेल्या गोरगरीब लाभार्थीना घर देण्याचा ठराव पारित करण्यात येणार आह़े 800 घरांसाठी जादा लाभार्थीचे अर्ज आल्यास, लॉटरीद्वारे सोडत करण्यात येऊन या घरांचे वाटप करण्याच्या विचारात नंदुरबार पालिका आह़े यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव देणार असून, येत्या काही दिवसात त्याचा निर्णय स्पष्ट होईल़ भाजप सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील योजनांचा पूर्ण बट्टय़ाबोळ करून ठेवल्याने लाभार्थी लाभांपासून वंचित रहात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला़ तहसीलदार कार्यालयात झालेल्या या आंदोलनात महिलांचा सर्वाधिक सहभाग होता़ आमदार रघुवंशी यांच्यासह शिष्टमंडळ तहसीलदार यांच्यासोबत चर्चा करत असतानाही, महिलांच्या घोषणा सुरूच होत्या़ शेतकी संघापासून नगरपालिका मार्गाने नेहरू चौकातून मोर्चा तहसील कार्यालयात आला होता़
वंचित लाभार्थीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
By admin | Published: February 15, 2017 12:08 AM