शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अर्थशास्त्रात कॉपी, 15 जणांवर कारवाई

By admin | Published: March 15, 2017 11:49 PM

बारावीची परीक्षा : भरारी पथक

धुळे : इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयात कॉपी करताना बुधवारी 15 जणांना पकडले. ही कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पथकाने केली. आतार्पयत ही सर्वात जास्त विद्याथ्र्यावर कारवाई आहे.बुधवारी सकाळी 11 ते 2 यावेळेत अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आठ जणांना कॉपी करताना पकडले. त्यांनी श्रीमती टी.बी.बागल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा या परीक्षा केंद्राला भेट दिली. या केंद्रावर तब्बल 5 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. तसेच दोंडाईचा येथील आर.डी.एम.पी.हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एक जणाला कॉपी करताना पकडले. शिंदखेडा येथील एम.एच.एस.एस. हायस्कूल परीक्षा केंद्रावर दोघांनी कॉपी करताना पकडले.याच विषयामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पथकाने सात जणांना पकडले. या पथकाने संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय थाळनेर या केंद्रावर दोघांना कॉपी करताना पकडले. तसेच थाळनेर येथील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पाच जणांना कॉपी करताना पकडले.16 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत वस्त्रशास्त्र व दुपारी 3 ते 6 यावेळेत मराठी साहित्य हा पेपर होणार आहे. तसेच इयत्ता दहावीचा 16 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत भूमिती विषयाचा पेपर होणार आहे.