धुळे : पालखीतून विसर्जन मिरवणुकीस पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय मंदिराच्या सदस्यांनी घेतलाय. विसर्जन पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय .
खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक खुनी मशीद समोर आल्यानंतर मशिदीवरून पुष्पवृष्टी करण्यात येते , मशिदीच्या मौलनांच्या हस्ते पूजा होत असते.
१५५ वर्षाची ही परंपरा यंदा खंडित झालीय ... गणेश विसर्जन करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं खुनी गणपती मंडळाला पाच जण विसर्जन करू शकतात , असं सांगण्यात आलं . मात्र पोलीस प्रशासनाची ही विनंती मंडळानं अमान्य करीत यंदा मानाच्या खुनी गणपती मंडळाचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतलाय . पुढील वर्षी या मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार असल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं .