धुळे: कोरोना सदृश परिस्थितीत लॉकडाऊन कालावधीत शहरात व शहर हद्दीत दाखल झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मजूर तसेच कामगार व नागरीकांची तात्पुरती निवाराची व्यवस्था शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे २० मार्च पासून करण्यात आली आहे. या निवारा केंद्रात एकूण ७८ मजूर आहे. यात केरळ येथील ५६ उत्तर प्रदेश १४ मध्य प्रदेश २, पश्चिम बंगाल १ व महाराष्ट्रातील इतर भागातील ५ असे एकूण ७८ नागरीक तथा मजूर दाखल आहेत. सदर व्यकतींची मनपाच्या आरोग्य विभागामार्फत दररोज सकाळ व संध्याकाळ आरोग्य तपासणी केली जात आहे. या निवाऱ्यातील एकही व्यकती कोरोना बाधीत नाही. दाखल नागरीकांना दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था सद्यस्थितीत मनपामार्फत करण्यात येत आहे. तसेच शहरातील अन्य सेवाभावी संस्थाकडून चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
परराज्यातील ८७ मजुरांची धुळ्यात राहण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 1:32 PM