लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील उमर्टी शिवारात असलेल्या म्हसावद येथील शेतकºयाच्या शेतातील कपाशीची ३०० च्या वर झाडे उपटून फेकल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेबाबत कैलास चौधरी यांनी म्हसावद पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.या घटनेत शेतकºयाचे ५० हजारांचे नुकसान झाले असून, अज्ञात इसमांनी नुकसान करण्याचा घटना वारंवार घडत असून, म्हसावद पोलिसांनी या अज्ञात इसमांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.याबाबत असे की, उमर्टी शिवारात पाडळदा येथील भिला दगडू न्हावी यांचे शेत असून, ते शेत भाडे कराराने म्हसावद येथील कैलास छोटूलाल चौधरी हे करीत आहेत. मात्र मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या शेतातील तीन फूट उंचीची ३०० हून अधिक कपाशीची झाडे उखडून फेकून दिल्याची घटना घडली. यात कैलास चौधरी यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. अशाच घटना सुलवाडे भागातही वारंवार घडल्या असून, यात केळी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले असल्याने म्हसावद पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या वेळी कापूस पीक उखडून फेकणाºया अज्ञात इसमांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून करण्यात आली आहे.पिकांच्या नुकसानीच्या घटना नित्याच्याचशहादा तालुक्यात शेतातील उभे पिके कापून नुकसान करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मध्यंतरी केळी आणि पपई या नगदी पिकांची झाडे उपटून नुकसान केल्याच्या घटना घडल्या होत्या. यासंदर्भात पोलिसात तक्रारी होतात. परंतु त्यानंतरही घटना सुरूच राहतात. अशा घटनांमुळे ऐन बहारावर आलेल्या पिकांचे रात्रीतून नुकसान होत असल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आणि त्यातच मानवी कृत्याचे, असे दुहेरी नुकसान शेतकरी सहन करीत आहेत.
कपाशीची झाडे उपटून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:26 AM