लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारी असलेल्या जिल्हा कारागृहाच्या मालकीच्या जागेपैकी ९८३़६५ चौमी इतके जमीन क्षेत्र रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले होते़ त्यानुसार जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाली असून शनिवारी या जागेची मोजणी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली़शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारी धुळे जिल्हा कारागृहाच्या मालकीची सिटी सर्व्हे क्रमांक ३५४५-अ मधील ९८३़६५ चौमी जागा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केल्यानुसार त्यांना उपलब्ध करून देऊन, चेनलिंक फेंन्सिंग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेले क्षेत्र ९८३़६५ चौमी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारजमा करण्यात यावे, अशी विनंती महसूल विभागाने केली होती़ त्यानुसार, गृह विभागाने तीन अटींच्या अधिन राहून जमीन बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचे आदेश दिले होते़ दरम्यान, सदर जागा महसूल विभागाकडे प्रत्यार्पित होऊन बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली़ त्यानंतर शनिवारी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत संबंधित जागेची आखणी व मोजणी करण्यात आली़ तसेच बंदीवानांनी यावेळी आखणीच्या ठिकाणी खोदकामही केले़ यावेळी तेजस गोटे, जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे, भिमसिंग राजपूत, योगेश मुकुंदे, अमोल मराठे, दिपक पाटील व अधिकारी उपस्थित होते़ यावेळी संबंधित जागेवर वाढलेली झाडेझुडपे जाळण्यात आली़ आता शासनाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणासाठीची जागा वगळून उर्वरित जागेस संरक्षण भिंत उभारण्यासह उर्वरीत अटींची पूर्तता केली जाणार आहे़ तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात केली जाणार आहे़
धुळे शहरातील जिल्हा कारागृहाच्या जागेची मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:36 PM
आमदार अनिल गोटेंची उपस्थिती, रस्त्यासाठी जागा वर्ग
ठळक मुद्दे- रस्ता रूंदीकरणासाठी जागेची आखणी व मोजणी - शासनाच्या आदेशानुसार जागा बांधकाम विभागाकडे वर्ग- ९८३़६५ चौमी जागेवरून होणार रस्त्याचे काम