लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लार्इंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे चालकाने साक्री तालुक्यातील दातर्ती गावाजवळ क्रॅश लॅडींग केले. या दुर्घटनेत पायलट जे.पी. शर्मा किरकोळ जखमी झाले. सुदैवाने विमानात पायलट सोबत असलेले अन्य पाच जण सुखरुप आहेत. क्रॅश लॅडींगचा आवाज झाल्याने घटनास्थळी दातर्ती ग्रामस्थ मदतीला धावून गेले. बॉम्बे फ्लार्इंग क्लबचे धुळ्यात गोंदूर विमानतळावर प्रशिक्षण केंद्र आहे. क्लबचे सायंकाळी सुरतहून धुळ्याकडे निघालेले विमान हे पायलट जे़ पी़ शर्मा चालवित होते. त्याच्यासोबत त्यांचे सहकारी प्रितम सिह (वय ३०), प्रशिक्षणार्थी अखिल ठकीला पती (२०), अशना मोहम्मद अन्सारी (२४), प्रणवसिंह (२८), तेजस रवी (वय ३०) असे सहा जण विमानात होते. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात हे विमान येताच विमानात तांत्रिक बिघाड झाला़ प्रसंगावधान राखत पायलट शर्मा यांनी तात्काळ निर्णय घेत हे विमान गावात न उतरविता गावालगत मोकळ्या जागेत क्रॅश लॅडींग केले़ क्षणार्धात निर्णय नसता घेतला तर हे विमान गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला धडकले असते़ यात मोठी दुर्घटना घडली असती़ सुदैवाने तसे झाले नाही़ विमान कोसळल्याची बातमी दातर्ती ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ परंतु विमानातून पायलट व अन्य प्रशिक्षणार्थी स्वत:च बाहेर आले. बराच वेळ होऊनही याठिकाणी प्रशासनातील कोणीही फिरकले नव्हते़ तब्बल अर्धा ते पाऊण तासाने त्याठिकाणी पोलीस पोहचले. किरकोळ जखमी पायलट शर्मा आणि अन्य जणांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ शर्मा यांना किरकोळ दुखापत झाली असून सर्वांची प्रकृती ठीक आहे़ प्राथमिक उपचार केल्यानंतर हे सर्व कारने धुळ्याकडे रवाना झाले आहे.
दातर्तीजवळ विमानाचे क्रॅश लॅडींग, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 10:27 PM
प्रशिक्षणार्थी विमान : सुदैवाने जिवीतहानी टळली
ठळक मुद्देहे विमान जेव्हा मालपूर - कासारेवरुन गेले तेव्हा ते हेलकावे घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दातर्तीजवळ आल्यानंतर हे विमान नदीत कोसळले असे वाटत होते. परंतु पायलटने ते आदिवासी वस्तीजवळील मोकळया जागेत क्रॅश लॅडींग केले. विमान कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आदिवासी वस्तीतील लोक हे घाबरुन नदीकडे पळून गेले.दातर्ती ग्रामस्थ हे जेव्हा विमानाजवळ पोहचले तेव्हा हे विमानातून जखमी कॅप्टन आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी बाहेर निघाले.