धुळे :तोतया व्यक्ती उभी करून बनावट मुख्त्यारपत्र तयार करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपींनी धुळे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीचे बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच मूळ मालकाऐवजी तोतया व्यक्तीस अधिकाऱ्यांसमोर उभे केले. याशिवाय बनावट नोंदणीकृत जनरल मुख्तीयार पत्र, बनावट खत तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार २७ मार्च १९ रोजी घडला.याप्रकरणी अंबादास जगन्नाथ पवार (५०, व्यवसाय नोकरी) यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून राजेश हिरालाल दाभाडे (रा. नंदुरबार), मनोहर चित्तम चवरे (धुळे), फिरोजखान अजिजखान पठाण (धुळे), निलेश आप्पा येलपले (पश्चिम हुडको), विलास पगुडवाले (धुळे), गोरख मधुकर सोनार (धुळे) यांच्या विरूद्ध भादंवि ४२०, ४१७, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ३४ सह भारतीय नोंदणी अधिनियम १९०८चे कलम ८२ व ८३ प्रमाणे २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आल. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील करीत आहेत.
बनावट मुख्त्यारपत्र तयार करून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:17 PM