लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव-ढंढाणे : धुळे तालुक्यातील तिसगाव ढंडाने परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला आहे. या रानडुकरांनी कपाशी, मका, मूग, ज्वारी बाजरी, मूग, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे.गेल्या काही दिवसांपासून तिसगाव येथील डोंगर धुळकू पाटील व राजाराम धुळकू पाटील, दोधु जयराम पाटील दीपक निळकंठ पाटील यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले. परिसरात एक दोन नाहीतर २० ते २५ भले मोठे रानडुकरांचा कळप रात्रीस सक्रिय होतो आणि पिकांचा फडशा पाडतो.त्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी शेत राखण्यााठी रात्री शेतात लाईट लावून हातात लाठ्या काठ्या घेऊन बसत असतात.मात्र रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन शेतात घुसून रानडुकरे शेतच करत असल्याचे सकाळच्यावेळी उघडकीस येत आहे.हातातोंडाशी आलेला घास व सोन्यासारख्या पिकाची डोळ्यासमोर अशी नासधूस होत आहे, हे पाहून परिसरातील शेतकरी संतप्त झालेला आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.
रानडुकरांनी केले पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:43 PM