लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पावसाने दुसºयांदा खंड दिला असून पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी १० मंडळांमध्ये आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला असून तेथील पिके करपत चालली आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. परंतु मध्ये दोनवेळा पावसाने खंड दिल्याने पिकांना तसेच प्रकल्पांनाही फारसा फायदा झालेला नाही. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु नंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ ओढवली होती. बहुसंख्य शेतकºयांनी दुबार पेरणीही केली. परंतु १३ जुलैपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले. परंतु आठवडाभर केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना तात्पुरते जीवदान मिळून उर्वरीत पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाच्या खंडामुळे पिके करपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:54 PM
शेतकरी संकटात : १० महसूल मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
ठळक मुद्देहवामान खात्याच्या भाकितावर विश्वास ठेवून शेतकºयांनी पेरण्या केल्या. मात्र आता संपूर्ण खरीप हंगामच संकटात सापडला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पाऊसच न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती कायम असून त्यात आणखी भर पडत चालली आहे. साक्री तालुक्याचा अपवाद वगळता प्रकल्पांमध्येही फारसा साठा झालेला नाही. सध्या ९ टॅँकरद्वारे ११ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या एकंदर परिस्थितीमुळे जिल्हा टंचाईग्रस्त घोषित करून सवलतींचा शेतकºयांना लाभ द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. जिल्ह्यातील ३९ महसूल मंडळांपैकी धुळे तालुक्यातील बोरकुंड, शिरुड, आर्वी, फागणे, मुकटी व सोनगीर, तसेच शिंदखेडा तालुक्यातील विखरण, साक्री तालुक्यातील कासारे, म्हसदी व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तेथील पिकांची स्थि