शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

पीक विमा योजनेतील अडचणी, त्रूटी दूर करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:20 PM

राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकºयांसाठी फायदेशीर असली तरी बºयाच अडचणी सोडविण्याची गरज आहे, अशी सूचना राज्याचे प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी योजनेच्या राष्टÑीय आढावा बैठकीत मांडली. बंगळुरू येथे नुकतीच ही बैठक पार पडली. त्यात राज्यातून एकमेव अ‍ॅड.पाटील यांची निवड करण्यात आली होती. बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत अ‍ॅड.पाटील यांनी सर्वसामान्य शेतकºयांना अडचणीच्या ठरणाºया अनेक बाबी, तरतुदी लक्षात आणून दिल्या. त्यात मुख्यत्वे पीक विमाच्या देश, राज्य व जिल्हा स्तरीय या समित्यांमध्ये  ज्याच्याकरीता ही योजना आहे त्यास म्हणजे शेतकºयास प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी सोडविल्या जात नाही, ही बाब निदर्शनास आणली. योजनेत विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै व ३१ डिसेंबर असते.शेवटच्या दोन-तीन दिवस शेतकºयांची एकदम गर्दी होते. तांत्रिक कारणामुळे मुदतवाढ देण्यात अडचणी येतात. त्यापेक्षा मुदत १५ जुलै व १५ डिसेंबर द्यावी आणि  १५ दिवस मुदतवाढ देण्याचे अधिकार राज्य सरकारला द्या, आदी मागण्या मांडल्या. या दोनदिवसीय चर्चासत्रात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल, अतिरिक्त सचिव देवेश चतुर्वेदी, पीक विमा योजनेचे सीईओ डॉ.आशिषकुमार भुतानी, पल्लवी माळी या अधिकाºयांसह राज्याचे मुख्य सांख्यिकी उदय देशमुख व इतर राज्यांचे शेतकरीही उपस्थित होते.बैठकीतील अन्य महत्त्वपूर्ण सूचना विमा नुकसान भरपाई वेळेतच दिली गेली पाहिजे. ती न दिल्यास १२ टक्के व्याजदर देय होतो. त्यासोबत ज्याची यात चूक असेल (राज्य शासन, विमा कंपनी) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तो निधी विमाधारक शेतकरी बांधवांकरीता वापरावा. विमा कंपनीस टेंडर प्रक्रिया करताना पारदर्शकता ठेवावी. कारण आज ही योजना शेतकºयांसाठी नसून विमा कंपन्यांकरीता असल्याचा आरोप होतो आहे. त्यात काही अंशी तथ्यसुध्दा वाटते, योजनेच्या चांगल्या बाबी जनतेपर्यंत येत नाहीत व शेतकºयांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे सकारात्मक शेतकºयांची निवड करुन, प्रशिक्षण देऊन, त्यांच्या समितीमार्फत योजना राबवावी. स्थानिक वादळ, गारपीटमुळे होणाºया नुकसानीचे पंचनामे मुदतीत व्हावे, विमाधारक शेतकरी यादी, मंजूर यादी, नुकसान भरपाई वाटप यादी ही संबंधित बँक व ग्रामपंचायत कार्यालयात लावावी. संबधित विमा कंपनीचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असावे.,विमा कंपनीस फोन लावला तर फोन उचलला जात नाही.त्याचे कारण भरपूर फोन येतात, असे सांगितले जाते.त्यामुळे कंपनीने जिल्ह्यात जास्त प्रतिनिधी नेमावेत.

टॅग्स :Dhuleधुळे