लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील क्षिरे कॉलनीत असलेल्या कनिष्क अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दिवसा घरफोडी झाल्यानंतर अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात दोन संशयित कैद झाले आहेत़ पोलिसांनी त्याचा आधार घेवून तपास कामातील गती वाढविण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी नोंदविल्या आहेत़ चोरी, घरफोडीच्या घटना वारंवार घडत असल्याच्या अनुषंगाने अपार्टमेंट, व्यापारी संकुलासह वैयक्तिक स्तरावर देखील आता सीसीटीव्ही कॅमेरा लावले जात आहेत़ यदा कदाचित अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यानंतर त्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची तपासणी करुन संशयितांना जेरबंद करणे पोलिसांना सोईचे होऊ शकते़ पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास कामाला गती देण्याची आवश्यकता आहे़ फुटेजची पडताळणी योग्य रितीने केल्यास पोलिसांना सहज शक्य होऊ शकते़ चोरटे यामुळे पोलिसांच्या हाती लागू शकतात़ पोलिसांनी यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. कारण याआधीही बºयाच ठिकाणी सीसीटीव्हीवरुन चोरटे कैद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्यानंतर पोलिसांचा पुढील तपासात काहीच हाती लागले नाही, असे घडले आहे.
धुळ्यात सीसीटीव्हीत झाले दोन चोरटे कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:53 AM
क्षिरे कॉलनीतील चोरीची घटना : पोलिसांनी याच्या मदतीने तरी चोरट्यांना पकडावे, नागरिकांच्या अपेक्षा
ठळक मुद्देशहरातील बाजारपेठेत आणि जवळपास सर्वच व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत़ काही गैरकृत्य आढळल्यानंतर तातडीने या कॅमेराच्या फुटेजची मदत पोलिसांना मिळून संशयितांचा शोध घेणे सोईचे होईल़ या अनुषंगाने पोलिसांनी देखील अशा फुटेजचीसंबंधितांकडून कॅमेराचे फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील तपासातील गती वाढविण्याची आवश्यकता आहे़ संशयितापर्यंत या माध्यमातून पोहचल्यास पुढच्यावेळेस चोरटे चोरी करताना धजावतील, असा वचक निर्माण करायला हवा़