लोकमत न्यूज नेटवर्कदहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी २९ नोव्हेंबरला सोडले होते. यासाठी लोकमतनेच पाठपुरावा केल्यामुळेच आवर्तन सोडण्यात आले होते. पहिल्या आवर्तनाला साधारण एक महिना लागतो. मात्र सातव्या दिवशीच पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटल्याने पाणी बंद झाले. आता पाटचारीचा भराव केव्हा होतो, केव्हा पाणी सुटेल. रब्बी हंगाम वाया जाईल का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटचारी का फुटली? याबाबतही शेतकºयांमध्ये शंका व्यक्त होत आहे.मालनगाव धरण ४०० एमसीएफटीचे आहे. रब्बी हंगाम ३१ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. आता दीड महिना उशिरा हंगाम सुरू होत आहे. शेतकरी रब्बी पिकासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र शाखा अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पाट दुरुस्तीसाठी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आमदार डी.एस. अहिरे यांनी पाटदुरुस्तीसाठी जेसीबी मशिन उपलब्ध करुन दिले होते. याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शहापुरे यांच्याशी संपर्क साधून प्रस्तुत प्रतिनिधीने वरील अडचण सांगितली. त्यांनी शाखा व उपअभियंता यांना बोलवून अडचण समजून घेतली व तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र शेतकºयांना रब्बी पिकाला पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे प्रशासन चालढकल करीत होते. पण शेतकºयांची व्यथा ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली. अखेर २९ नोव्हेंबरला रब्बी हंगामाला पाणी सोडले. ५०० पेक्षा जास्त शेतकºयांनी पाणी अर्ज भरले. रब्बीची पेरणी तयार केली. काहींनी प्रत्यक्ष रब्बी पिकाची पेरणीही केली. १० ते १५ टक्के पहिल्या आवर्तनाचे पाणी भरले. तेवढ्यात सात डिसेंबरला रात्री धरणापासून ६५० मीटर अंतरावर पाटचारीला भगदाड पडले. पाटचारी तुटली, रात्रीतून ४० ते ५० क्यूसेस पाणी नदीत वाहून गेले. सकाळी पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी बंद केले. आता पाट दुरुस्तरीसाठी निधी मागणी अहवालाचे कागदी घोडे नाचवून पाणी केव्हा सुटेल हे सांगता येत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.शेतकºयांमध्ये अशीही चर्चा आहे की, पाटचारीला भगदाड कसे पडले याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण वीज वितरण कंपनीचा मेन लाईनला साक्रीजवळ कावठे शिवारात बिघाड झाला तो सापडायला व विद्युत पुरवठा शेतकºयांना मिळायला २४ तास लागले. हा योगायोगच आहे का? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाटबंधारे अधिकाºयांनी तात्काळ दखल घ्यावी व फुटलेली पाटचारी दुरुस्तीची मागणी होत आहे.
पाटचारी फुटल्याने आवर्तन लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:29 PM