शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे येथे बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली.
गॅस सिलिंडरच्या स्फोटात लागलेल्या आगीत दोन रहिवासी घरांतील गृहोपयोगी वस्तू, रोकड, दागिने जळून खाक झाल्या असून त्या आगीत दोन्ही घरांचे 21 लाख 25 हजार 800 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे येथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास निंबा नथा पाटील व विश्वास गोरख पाटील यांच्या राहत्या घराला आग लागली. निंबा नथा पाटील यांचे 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे घर जळून खाक झाले. घरातील आगीत 7 लाख रुपयांची रोकड, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये किमतीचा टीव्ही, फ्रीज, फॅन व 13 हजार रुपये किमतीचे हरभऱ्याचे बियाणे, 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या घरातील वस्तू आगीत जळून खाक झाल्या. आगीत निंबा पाटील यांचे घरासह 12 लाख 83 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच याच घराला लागून विश्वास गोरख पाटील यांचे घर होते. या आगीत 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे निवास्थान, 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड, 30 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी,1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 3 तोळे सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅमची अंगठी, 13 हजार रुपये किमतीची चक्की, 30 हजार रुपये किमतीचा फ्रीज, टीव्ही, 5 हजार रुपये किमतीचा फवारणी पंप, 1 लाख 90 हजार रुपये किमतीचे घरघुती -गृहपयोगी साहित्य , 22 हजार 800 रुपये किमतीचे रासायनिक खत आगीत जळून खाक झाले. आगीत विश्वास पाटील यांचे 8 लाख 42 हजार 800 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन्ही घरे व घरातील साहित्य आगीत जळून 21 लाख 25 हजार 800 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अपर तहसीलदार सुदाम महाजन, जि.प. माजी सदस्य कामराज निकम, पोनि दुर्गेश तिवारी, सपोनि डॉ. संतोष लोले, सर्कल महेशकुमार शास्त्री आदींनी घटनास्थळी भेट दिली. दोंडाईचा व शिंदखेडा येथील अग्निशमन बंबने आग विझविली. दरम्यान दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्म झाली. गुरुवारी तलाठी दीपक ईशी यांनी पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अंदाज केला.
फोटो- आगीच्या भक्षस्थानी पडलेली घरे.