ऑनलाईन लोकमतधुळे, दि.25 - रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्डय़ा खून प्रकरणातील संशयित आरोपी अभय उर्फ दादू रमेश देवरे याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आह़े पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत़ गुड्डय़ाचा खून 18 जुलै रोजी सकाळी झाल्यानंतर घटनेतील संशयित आरोपी फरार झाल़े आता पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या प्रकरणातील आरोपींशी संबंधित नातेवाईक, जवळचे मित्र यांच्याकडे चौकशी करण्याचे काम हाती घेतले आह़े साक्री तालुक्यातील कासारे येथील एका नातेवाईकाच्या घरी संशयित आरोपी अभय उर्फ दादू देवरे हा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती़ माहिती मिळताच पोलीस पथकाने साक्री तालुक्यातील कासारे गावात जावून सापळा लावला़ दादू देवरे हा एका नातेवाईकाच्या घरी सापडला़ त्याला तातडीने पोलीस बंदोबस्तात धुळ्यात आणण्यात आल़े त्याला मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसांची (29 जुलैर्पयत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े अभय हा फरार भद्रा देवरे याचा भाऊ आह़े
दादू देवरेला पाच दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 7:13 PM
धुळ्यातील गुडय़ा खून प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
ठळक मुद्देधुळे येथील गुड्डया खून प्रकरणात दुस:या संशयिताला अटकमंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडीसाक्री तालुक्यातील कसारे गावातून घेतले होते पोलिसांनी ताब्यातगुड्डया खून प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरु