लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इंडियन मेडीकल असोसिएशन, धुळे व डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दामाकॉन वैद्यकीय शैक्षणिक परिषद व दामाकॉन २०१८’ या पुरस्काराचे वितरण रविवारी जेलरोडवरील आयएमए सभागृहात झाले. या कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांना ‘दामा भूषण’ तर ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ तथा जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरूण साळुंके यांना ‘दामा मित्र’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. अरूण मोरे, आयएमए धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, कार्याध्यक्ष डॉ. नीता हटकर, सचिव डॉ. पराग उपकारे, दामा अध्यक्ष डॉ. दीपक शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप सोनवणे, सचिव वैभव खिल्लारे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची तयारी ठेवाकार्यक्रमात प्रा. बाबा हातेकर यांनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करीत विविध पदव्या संपादित केल्या. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आता सर्व सोयी, सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी अशा सुविधा नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट घेत नावलौकीक मिळविले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी आयएमतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आयएमए शाखेत कर्मचाºयांनाही गौरविण्यात आले.